महाविद्यालयीन तरुणीवर तिघांचा बलात्कार

एक आरोपी ताब्यात तर अन्य दोघांचा शोध सुरु! पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

महाविद्यालयीन तरुणीवर तिघांचा बलात्कार

सोनपेठः राज्यातल्या बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोनपेठ तालुक्यातील डिघोळ तांडा येथील एका महाविद्यालयीन युवतीवर तीन तरुणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  या घटनेने घाबरलेल्या तरुणीने विषारी औषध प्राशन करुन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता, तिच्यावर आता उपचार चालू आहेत. या घटनेने संपुर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक जयंत मिना यांनी सोनपेठ पोलीस स्थानकास भेट दिली असून घटनेचा तपास वेगाने करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

डिघोळ तांडा येथील तरुणी सोनपेठच्या महालिंगेश्वर महाविद्यालयात शिक्षण घेते. डिघोळ येथीलच एक तरुण तिची गेले दोन वर्षे छेड काढत होता त्यावेळी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी त्यास समजावून सांगितले होते. मात्र त्यानंतरही या तरुणाने आणखी दोघांना सोबत घेऊन मुलीसोबत जबरदस्ती करण्याचा प्रकार चालूच ठेवला होता. मात्र १२ सप्टेंबर रोजी दुपारी तीन आरोपींनी एकत्र येऊन पीडितेवर बलात्कार केला. या घटनेनंतर तरुणीने समाजात आपली, आपल्या कुटुंबीयांची बदनामी होईल या भीतीने विषारी औषध घेऊन आपली जीनवयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेच्या कुटुंबीयांनी तात्काळ तीला लातूर येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.पीडीता सध्या गंभीर अवस्थेत असून तीची मृत्युशी झुंज चालू आहे.

या घटनेनंतर १९ सप्टेंबरला पोलिसांनी भादंवी कलम ३७६(ड),३५४(ड)३४ सह कलम ३,६,८,१७ सह पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.घटनेचा अधिक तपास सोनपेठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकाने,पोलीस उपनिरीक्षक विष्णु गिरी,पोलीस उपनिरीक्षक मंचक फड यांच्यासह सोनपेठ पोलीस करत आहेत.दरम्यान दिवसेंदिवस घडणाऱ्या अशा गंभीर घटनांमुळे महीला, मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा धाक नसल्याने अशा घटना घडत असून अशा आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.