ती चक्क पोलीसाला चाटली

1 min read

ती चक्क पोलीसाला चाटली

कोरोनामुळे लागू केलेल्या संचार बंदीत एकएक विचित्र अनुभव पोलीस प्रशासनाला येत आहेत. अडवल्याच्या रागात एका महिलेने पोलीसाला चक्क चाटल्याची घटना घडली आहे.
पश्चिम बंगालच्या बिधाननगर भागातील ही घटना आहे. संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी पोलीस पोलीस नाकाबंदी करून उभे होते. त्यांनी एक महिला व एक पुरूष ड्रायव्हर सह जात असलेली गाडी अडवली. आणि चौकशी करायला सुरूवात गेली. गाडी अडविल्याचा राग तरूणीला आला. तिने आपण औषध आणायला जात असल्याचे सांगितले. पोलीसांनी तिला औषधाची डक्टरांनी दिलेली चिठ्टी मागितली. त्यावर ती तरूणी भडकली आणि चक्क चौकशी करणा-या अधिका-याच्या अंगाला चाटून गेली. वर बघितले ना मी तुला काय केले ते असे सांगायला ती विसरली नाही.
यावर पोलीस अधिकारी चांगलाच गडबडला. पण तोवर ती तरूणी पोलीसाला चाटून दूर गेली होती. आणि बडबड करतच होती.
पोलीसाांच्या कामात हस्तक्षेप करणे, पोलीसांला इजा पोहचविण्याचा प्रयत्न करणे या आरोपावरून तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. आणि तिला अटक देखील करण्यात आली.
या प्रसंहातून लोकांची वृत्ती समोर येत आहे.