टाइम टाइम की बात.. जगातला श्रीमंत परीवार आता गरीब

1 min read

टाइम टाइम की बात.. जगातला श्रीमंत परीवार आता गरीब

सहा हजार नौकर, हि-याचा पेपरवेट आणि शेकडो करोड रूपयांचे सोने. टाईम मासिकाने घेतली होती श्रीमंतीची नोंद पण सगळेच हिरावले गेले.

टाइम टाइम की बात है!

एक काळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, ज्याचा उल्लेख टाइम्स मॅगजीनने देखील केला आहे. २२ फेब्रुवारी १९३७ साली त्यांना पृथ्वीतलावरील सर्वात श्रीमंत व्यक्ती ‘Richest Man On Earth’ म्हणून जाहीर केले.
हैद्राबाद संस्थानचा शेवटचा निजाम उस्मान अली खान, असफ जाह (सातवा) यांचा जन्म ६ एप्रिल १८८६ मध्ये झाला. वयाच्या २५ व्या वर्षी तो निजाम म्हणून शासक बनला आणि १९११-१९४८ या ३७ वर्षाच्या कालखंडात हैद्राबादवर आपले आधिपत्य गाजवले.याच दरम्यान त्यांनी सर्वात जास्त संपत्ती देखील गोळा केली.

उस्मान अली खान यांचे दैनिक उत्पन्न जवळजवळ ५,००० डॉलर एवढे होते. (आताच्या दराने हिशोब लावायचा ठरवला तर साडे तीन लाख रुपये रोज) त्याच्या दागदागिन्यांची एकूण किंमत १५ कोटी डॉलर एवढी होती. डॉलर इतकी होती. म्हणजे साडे तीनशे कोटी रुपये. तर त्यांच्याकडे असलेल्या सोन्याची किंमत २५ कोटी डॉलर एवढी नमूद करण्यात आली होती. त्यांचं एकूण भांडवल हे १,४००,०००,००० डॉलर इतकं होत.
निझामच्या राजवटीत त्यांच्या परिसरात त्यांचे स्वतःचे चलन ‘हैद्राबादी रुपया’ म्हणून चालायचे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे २३० अब्ज डॉलर इतकी होती.
निजामाचे शौक तरी कसे होते बघा..
IMG_20200730_112629
आपल्या कार्यालयात तो पेपरवेट म्हणून काय वापरायचा तर जाकोब नावाचा हीरा...
ज्याची किंमत १०० मिलियन पाउंड्स एवढी होती. बापरे बाप! किती ही अय्याशी! नाहीतर आजकाल डावे लेखक निजामाचे कौतुक करत असतात.
त्यांच्या महालात ६००० कर्मचारी कामावर होते, त्यांच्यापैकी ३८ हे केवळ महालातील झुंबरची साफसफाई करण्यासाठी होते. म्हणजे झुंबर किती असतील याचा विचार न केलेलाच बरा!
३४ मुले आणि १०४ नातवंडे असा जम्बो परिवार होता. अर्थात बायका देखील खूपच असतील..हे वेगळे सांगायला नको एकूणच काय तर विलासी जीवन होते.
IMG_20200730_112648
१९४८ साली भारत सरकारने निज़ाम यांचे राज्य आणि त्यांची संपत्ती जप्त केली. सगळीच संपत्ती जप्त होऊ नये म्हणून निज़ामाने लंडन येथील नॅटवेस्ट बँकेत १ मिलियन पाउंड ट्रान्स्फर केले. जेणेकरून त्याच्या नातू मुकर्रम जाह याला त्याचा काही भाग मिळावा आणि जगण्याची काहीं व्यवस्था व्हावी समात्र ब्रिटीश सरकारने ही रक्कम जप्त केली. ती रक्कम देखील निजामाला मिळू शकली नाही