नवी दिल्ली : आज गुगलच्या २२ वा जन्मदिवस आहे. जन्मदिनानिमित्त गुगलने एक खास डुडल होम पेजवर तयार केले आहे. या खास रंग-बेरंगी डुडलवर क्लिक केल्यावर गुगलच्या सर्च रिझल्ट पेजवर तुम्ही जाणार. गुगल डुडलला फेसबुक, ट्विटर आणि इमेलद्वारेही तुम्ही शेअर करु शकता. गुगल डुडलवर एक कॉपी बटण दिले आहे. त्यामुळे तुम्ही सहज कुठेही शेअर करु शकता.
प्रत्येक डुडलप्रमाणे यावरही एक शॉर्ट डिस्क्रिप्शन तयार केलं आहे. ज्यामध्ये सेलिब्रेशन संबंधित एक माहिती दिली आहे. गुगलची स्थापना लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी 1998 मध्ये केली होती. हे दोघे त्यावेळी स्टॅनफोर्ड यूनिव्हिर्सिटीमध्ये पीएचडी करत होते. गुगल हा शब्द गणिताच्या Googol या शब्दावरुन तयार केला आहे.
आज गुगलचा 22 व्या जन्मदिनानिमित्त एक खास डुडल आहे आणि यामध्ये G अक्षर एका बर्थडेच्या टोपीसारखे तयार केले आहे. तसेच ते अॅनिमेटड आहे. हा G एका लॅपटॉपमध्ये पाहत आहे आणि त्याच्या आजूबाजूला सर्व गिफ्ट बॉक्स, एक केक आहे. तर बाकीचे चार अक्षरं एका विंडोमध्ये दाखवले आहेत.
दरम्यान, गुगल शब्द 2002 मध्ये अमेरिकन डायलेक्ट सोसायटीद्वारे सर्वाधिक वापरणारा शब्द म्हणून निवडला गेला. यानंतर चार वर्षांनी हा शब्द ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीमध्ये जोडला गेला.