छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान नेहमीच प्रेरणादायी- मंजुषा कापसे

आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन आहे. परभणीतील विजयश्री नगर येथे diamonds ७ ग्रुपच्या कलावंतांनी १० बाय ८ फूट रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले.

छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान नेहमीच प्रेरणादायी- मंजुषा कापसे

परभणी : छत्रपती संभाजी महाराजांनी राष्ट्राच्या हितासाठी प्राणांची पर्वा न करता बलिदान दिले, ही बाब सर्वांसाठीच कायम प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे यांनी केले.

आज छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान दिन आहे. परभणीतील विजयश्री नगर येथे diamonds 7 ग्रुपच्या कलावंतांनी १० बाय ८ फूट रांगोळीच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. यावेळी त्या बोलत होत्या. रांगोळीकार प्रमोद उबाळे, संजना लकारे, एम.व्ही. आडे, रोहिणी सावंत, ज्योती रन्हेर, माया काळे आदी कलावंतांनी तब्बल १० तासांच्या अथक परिश्रमातुन ही रांगोळी साकारली होती.

यावेळी पुढे बोलताना कापसे म्हणाल्या, माणसाने स्वतःमधील कलावंताला जपुन कला जिवंत ठेवणे ही काळाची गरज बनली आहे. कलाकार एकमेकांना जोडण्याचे काम करतो. कलावंत जगला तरच कला वाढू शकते. यासाठी समर्पणही तेव्हढेच महत्वाचे आहे. यावेळी रांगोळी कलावंतांचेही त्यांनी कौतुक केले. महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामाच्या माध्यमातून कलावंतांना व्यासपीठ मिळवून दिले जात आहे. याचा नवोदित कलावंतांनी लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश कुलकर्णी तर आभार मनीषा उमरीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मधुकर उमरीकर, प्रवीण वायकोस , भारत शहाणे, प्रकाश बारबिंड, सिद्धांत उमरीकर, संदीप राठोड आदींनी प्रयत्न केले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.