उद्धव ठाकरेंचा नाव न घेता 'राज' यांना टोला

मास्क न वापरण्यात शौर्य कसले? मास्क वापरत नाहीस म्हणजे तू कोणी शूर आहेस का? - उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंचा नाव न घेता 'राज' यांना टोला

मुंबईः कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधला. राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लावण्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर, मुख्यमंत्र्यांनी जनतेला सर्व प्रकारची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. मास्कच्या वापरावरून मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

कोरोनाची वाढतीसंख्या पाहुन करोनाची खिल्ली उडवणाऱ्या, लॉकडाउन विरोधात रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्यांनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सुनावले आहे. मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असा सल्ला प्रशासनातर्फे दिला जात असतानाही अनेक जण विनामास्क फिरत असल्याचे चित्र दिसत आहे.

अनेकांना असे वाटते की मास्क वगैरे काय लावायचा? मी मास्क वगैरे वापरत नाही असे काही लोक इतरांना सांगतात. पण मास्क न वापरण्यात शौर्य कसले? मास्क वापरत नाहीस म्हणजे तू कोणी शूर आहेस का? मास्क लावण्यात लाज वाटण्यासारखे काय आहे?, असा खोचक टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे. 'लसीकरण घेतल्यानंतरसुद्धा मास्क लावलाच पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मागील काही दिवसांत मास्क न घालता जाहीर कार्यक्रमांत सहभागी झाले होते. त्याबद्दल त्यांना विचारले असता मी मास्क वापरत नाही, असे ते म्हणाले. नाशिकच्या दौऱ्यात त्यांनी मास्क घालणाऱ्या माजी महापौरांना त्याबद्दल विचारणा केली होती. राज ठाकरे यांच्यावर सरकार काय कारवाई करणार, असा प्रश्न जनतेमधुन विचारला जाऊ लागला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.