पर्यटनस्थळे नागरिकांसाठी खुली, मात्र धार्मिक स्थळांना बंदी

व्यावसायिकांनी सात दिवसांत आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक...

पर्यटनस्थळे नागरिकांसाठी खुली, मात्र धार्मिक स्थळांना बंदी

औरंगाबाद : शहरातील बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, दौलताबाद किल्ला या पर्यटनस्थळांमध्ये सकाळच्या सत्रात एक हजार, दुपारच्या सत्रात एक हजार पर्यटकांना प्रवेशाची अनुमती असणार आहे. साफ सफाई, सुरक्षितता व स्वच्छता तयारी आदी विशेष बाबींसाठी संबंधित पर्यटन स्थळे आज पासुन सकाळी ६ वाजेपासुन चालु झाली आहेत. तसेच औरंगाबाद मंडळांतर्गत येणारी जिल्हयातील धार्मिकस्थळे मात्र, पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

पर्यटन स्थळे खुली आणि कोरोना रूग्णांची संख्या कमी जरी होत असली तरी नागरिक, व्यावसायिकांनी स्वयंशिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. त्रिसुत्रीचा वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

**व्यावसायिकांना आरटीपीसीआर बंधनकारक
**

पर्यटकांना पर्यटनांचा आनंद व्हावा, अनेक रोजगारांना मदत व्हावी, या उद्देशाने सर्व पर्यटन स्थळे सुरू करण्यात येत आहेत. त्यामुळे पर्यटन उद्योगातील व्यावसायिक, खेळणी विक्रेते, फूड स्टॉल विक्रेते, गाईड आदींनी आरटीपीसीआर चाचणी सात दिवसांत करणे बंधनकारक आहे. जर या व्यक्तींनी लसीकरणाचे दोन्ही डोस घेतले असतील; कोणतीही कोरोना आजारांची लक्षणे नसतील, अशांनी आरटीपीसीआर चाचणी करण्याची आवश्कता नाही. मात्र, त्यांनी लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक असल्याचेही चव्हाण म्हणाले


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.