सावकाराने नेले ट्रॅक्टर, शेतकऱ्याची आत्महत्या

ट्रॅक्टरकरिता घेतलेल्या कर्जाच्या परतफेडी साठी ट्रॅक्टर ओढून नेल्याने शेतकऱ्याने केली आत्महत्या

सावकाराने नेले ट्रॅक्टर, शेतकऱ्याची आत्महत्या

निलंगा/प्रतिनिधी : सावकाराच्या जाचाला कंटाळून निलंग्यात शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना निलंगा तालुक्यात घडली आहे. तालुक्यातील हरीबा चव्हाण वय ५० वर्षे राहणार गौर तांडा येथील शेतकऱ्याने ट्रक्टर घेण्यासाठी बाभळगाव येथील एका सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते. परंतु गेल्या दहा महिन्यापासून कोरोना काळात ट्रॅक्टरला काम लागत नव्हते व सततची नापिकी यातच सावकाराचा वसुलीचा तगादा, जमीन, दोन एकर कुटुंबियाचा सांभाळ कसा करावा. सावकाराने ट्रॅक्टर ओढून नेले. नैराश्यातून या शेतकऱ्याने आपल्या शेतातील पिकावर फवारणीसाठी ठेवलेले औषध घेवून आत्महत्या केली आहे.

त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परीवार आहे. सदरील शेतकऱ्याने विष घेतल्याचे समजताच संबंधित सावकाराने ट्रॅक्टर घरी आणून सोडले आहे. संबंधित  शेतकऱ्याला लातूर येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता दि. ३ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता या शेतकऱ्याची प्राणज्योत मालवली यासंबंधी लातूर येथील गांधी चौक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, व पुढील तपास पोलिस करत आहेत.

शेवविच्छेदन करून सदरील शेतकऱ्याचे प्रेत अंत्यविधीसाठी कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे गौर तांडा परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अशा अनेक घटना लातूर जिल्ह्यात घडत आहेत, परंतु पोलिस प्रशासन सावकारा विरोधात ठोस पाऊल उचलत नाहीत म्हणून शेतकऱ्यांचे नाहक बळी जात आहेत.अशा मुजोर सावकारावर शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.