लातूर जिल्ह्यातील सर्व राज्यमार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प

लातूर ते जहिराबाद,नागपूर लातूर,नांदेड नागपूर ,निलंगा ते उदगीर, निलंगा ते नांदेड, निलंगा ते कासारसिरसी मार्गे उमरगा सर्व राज्यमार्गावरचे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

लातूर जिल्ह्यातील सर्व राज्यमार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प

लातुर : जिल्ह्यातील वाहणाऱ्या मांजरा व तेरणा नदीपात्राने धोक्याची पातळी ओलांडली असल्यामुळे अनेक राज्यमार्गावरील पुल (ब्रीज) पाण्यात गेली असल्यामुळे १२ तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे दळणवळणाची सुविधा कोलमडली आहे. धरणातून पाणी सोडणे कमी केले असले तरी कालपाासुन पाण्याचा प्रवाह 'जैसे थे' आहे.

सतत पडत असलेल्या पावसामुळे धनेगाव ता. केज येथील धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले होते यातून सत्तर हजार ८०० क्युसेस पाण्याचा विसर्ग मांजरा नदीपात्रात झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले त्यामध्ये मसलगा ता. निलंगा मध्यम प्रकल्पाचेही दोन दरवाजे उघडण्यात आली आहेत. त्यामुळे मांजरा नदीपात्रात अधिक पाण्याची भर पडली आहे. या नदीकाठच्या १३ गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हालसी-तुगाव व चिचोंडी गावांना धोका होण्याची शक्यता असल्यामुळे कांही कुटूंब पाण्याचा प्रवाह वाढल्यास हलवावे लागणार आहेत. बसपूर-बाकली या पूलावरून पाणी पडत असल्यामुळे हा रस्ता बंद वाहतुकीला करण्यात आला आहे. शिवाय निलंगा ते शिरूरअनंतपाळ जाणाऱ्या रस्त्यावर उजेड ता. शिरूरअनंतपाळ येथील पूलावरून पाणी पडत असल्यामुळे हा रस्ता बंद झाला आहे. तर निलंगा ते उदगीर जाणाऱ्या रस्त्यावर धनेगाव ता. देवणी येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक सकाळी बंद आहे. तर निलंगा ते कासारसिरसी मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग नऊकडील वाहतूक तेरणा नदीला पूर आल्यामुळे लिंबाळा ता. निलंगा येथील पूल पाण्याखाली गेला असल्यामुळे त्या मार्गावर जाणारी वाहतूक बंद झाली आहे. शिवा पाण्याच्या प्रवाहामुळे ग्रामीण भागात जाणारे जिल्हा अंतर्गत मार्गही बंद असून अतिवृष्टीमुळे दळणवळणाची सुविधा ठप्प झाली आहे. गेल्या बारा तासापासून हे राज्यमार्ग बंद अल्यामुळे त्या भागातील वाहतूक ठप्प झाली आहे.

सालगडी आडकला
निलंगा तालुक्यातील मुगाव-मसलगा गावाच्या मध्ये वांजरखेडा शिवारात मांजरा नदीच्या पुराचे पाणी चहुबाजूने असल्यामुळे शिवाजी भिमराव कुदरे हा व्यक्ती सालगडी म्हणून एकाच्या शेतात अडकल्याची माहीती रात्री प्रशासनाला मिळाली. सकाळी तहसीलदार गणेश जाधव व एनडीआरएफची टीम घटनेच्या ठिकाणी आले असून एक तासात बाहेर काढले आहे. कालच संबंधित सालगडी कुदरे यांनी आपले कुटूंब सुरक्षित स्थळी पाठवून ते घरी थांबले होते. मात्र पाण्याचा प्रवाह सर्व बाजूने वेढल्याने त्यांना बाहेर निघणे मुश्कील झाले. अखेर माजी पंचायत समिती सदस्य सुरेंद्र धुमाळ यांनी तत्काळ ही माहीती प्रशासनाला दिली. व त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहीती तहसीलदार गणेश जाधव यांनी दिली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.