इंजेक्शनच्या खरेदी विक्रीसाठी नियमावली तयार करुन पारदर्शकता अणावी

प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी..

इंजेक्शनच्या खरेदी विक्रीसाठी नियमावली तयार करुन पारदर्शकता अणावी

परभणी: जिल्हयात कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या रुग्णांसाठी जीवनदान ठरणाऱ्या रेमीडेसीवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. नेमका याच संधीचा फायदा घेत वैद्यकीय व्यवसायातील ठोक व किरकोळ औषध विक्रेते व काही दवाखाने हे नेमलेल्या दलालांमार्फत किवा स्वतःच मोठया प्रमाणावर काळा बाजार करत आहेत. एमआरपी पेक्षाही दुप्पट व चौपट रक्कम मागुन इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा केला जात आहे. या ईंजेक्शनच्या विक्रीची नियमावली तयार करुन यात पारदर्शकता आणावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे.

पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दिपक मूगळीकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले आहे. कोवीड महामारीच्या काळात अत्यावश्यक औषधांचा काळा बाजार ही अत्यंत गंभीर बाब आहे. राज्य शासनाने रेमीडीसीवीर इंजेक्शनच्या विविध कंपन्यांना एमआरपी पेक्षा जास्त किंमतीमध्ये इंजेक्शन विकू नये व विकल्यास कार्यवाही केली जाईल अशा सूचना अनेकदा दिल्या आहेत. असे असतानाही जिल्हयामध्ये इंजेक्शनचा मोठया प्रमाणावर काळा बाजार सुरु आहे. परभणी जिल्हयातील औषधांच्या खरेदी - विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी औषधी निरिक्षक, अन्न व औषधी प्रशासन कार्यालय यांच्यावर आहे. असे असतानाही संबंधीत कार्यालय कुंभकर्णाच्या झोपचे सोंग घेत आहे. रेमडीसवर इंजेक्शनचा होत असलेला काळा बाजार संबंधीत विभागाला दिसत नाही व हे कार्यालय मुग गिळुन गप्प आहे.

ज्या औषधी विक्रेत्यांना हे इंजेक्शन विकण्याची परवानगी आहे त्यांच्यासाठी नियमावली तयार करावी. त्यात त्यांनी खरेदी केलेल्या इंजेक्शनच्या साठ्याची संपूर्ण माहिती पुरवठादाराचे नाव व इंजेक्शनच्या संख्येसह नोंदवावी, तसेच ज्या कोवीड रुग्णांना इंजेक्शन विकले जाईल त्या रुग्णासाठी इजेक्शनची आवश्यकता असल्याबाबत डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन तसेच संबंधीत रुग्णांच्या आधारकार्डची प्रत व रुग्णांचे आरटीपीसीआर पॉझिटिव्ह असल्याच्या रिपोर्टची सत्यप्रत घणे सक्तीचे करावे जेणे करुन या इजेक्शनच्या काळ्या बाजाराला आळा बसेल. तसेच या प्रकरणाची चौकशी करुन महामारीच्या काळात लुटमार करणाऱ्या दोषींवर कठोर कार्यवाही करावी व रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होण्याबाबत व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, पिंटु कदम, ज्ञानेश्वर पंढरकर, बाळू नरवाडे, बंडू पावडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.