बंजारा कवी ह.भ.प.प्रेमदास महाराज यांना श्रद्धांजली अर्पण

1 min read

बंजारा कवी ह.भ.प.प्रेमदास महाराज यांना श्रद्धांजली अर्पण

सेवालाल महाराजांनी समाजाला दिलेला संदेश युवकांनी अंमलात आणत जीवनाची कार्यपद्धती अवलंबली पाहिजे अशा शब्दात श्रद्धाजंली वाहिली.

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: अखिल भारतीय बंजारा कवी प्रेमदास महाराज वनोलीकर यांचे दि.२६ ऑगस्ट गुरुवार रोजी दुःखद निधन झाले. त्या निमित्ताने आज टिकूनाईक तांडा शेळगाव ता.सोनपेठ,जिल्हा.परभणीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी उपस्थित भीमराव महाराज (टीकुनाईक तांडाशेळगाव),गोरसेनेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार,यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
यावेळी अंकुश पवार यांनी प्रेमदास महाराजांनी निर्विकार वृत्ताने बंजारा समाजातील प्रबोधनात्मक गीते रचून समाजातील नव्या पिढीला सेवालाल महाराज कसे होते. सेवालाल महाराजांनी समाजाला दिलेला संदेश युवकांनी अंमलात आणत जीवनाची कार्यपद्धती अवलंबली पाहिजे अशा शब्दात श्रद्धाजंली वाहिली.