ट्रक गेला वाहून

1 min read

ट्रक गेला वाहून

बिदर : औराद शहाजनीपासून जवळच असलेल्या जामखंडी येथील नदी पात्रात मालवाहक ट्रक उलटतानाचा हा थरार. ट्रक दोन दिवसांपासून घटनास्थळी अड़कुन पडला होता. यापूर्वी सदर ठिकाणी अनेक अपघात झाले असून त्याकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्षच झाले आहे.

बिदर : औराद शहाजनीपासून जवळच असलेल्या जामखंडी येथील नदी पात्रात मालवाहक ट्रक उलटतानाचा थरार चित्रबद्ध केलेला ट्रक दोन दिवसांपासून घटनास्थळी अड़कुन पडला होता. ट्रकसह मालाचे खुप मोठे नुकसान झाले असले तरी चालक सुरक्षित आहे. यापूर्वी सदर ठिकाणी अनेक अपघात झाले असून त्याकडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्षच झाले आहे.
हुलसूरपासून जवळच असलेल्या भालकी तालुक्यातील जामखंडी येथील रझाकाराच्या जमान्यात बांधलेला पुल महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांना जोडणारा एकमेव पुल. या पुलाचे काम सुमारे पाच-सहा वर्षांपासून रखडलेले आहे.
या पुलापाशी लहान मोठे अपघात नेहमीच होत असतात. अपघातात आतपर्यंत अनेकांचा बळी गेलेला आहे. याकडे भालकीच्या आमदाराचे लक्ष, ना बसवकल्याणच्या आमदाराचे अवधान. शिवाय सार्वजनिक बांधकाम विभागालाही पुलाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. सदर पुलाचे कटडे केव्हाच मोडून पडले आहेत. त्यावरील डांबरी रस्ताही उखडून मोठ-मोठे खड्डे पडले. खड्डे कसले भगदाडच ते... हा पुल नादुरुस्त होऊन चार-पाच वर्षे झाली.
पूल धोकादायक झाल्याने नदीपात्रात खड़ी, मुरुम टाकून पर्यायी व्यवस्था म्हणून कच्चा रस्ता बनवला. धोका नको म्हणून मोठी वाहने कच्च्या रस्त्यावरून जायची तर दुचाकी व लहान वाहने जुन्या पुलाचा वापर करत. पण दोन दिवसातल्या जोरदार पावसाने कच्च्या रस्त्याची वाट लावली. तोही रस्ता पुर्णपणे उखडून गेला. त्यामुळे रात्रीच्या सुमारास मोठ्या गाड्या पाण्यामुळे रस्ता न दिसल्यामुळे अडकुन पडत. बुधवारी सायंकाळी असाच एक मालवाहक ट्रक (क्रमांक टीएस १२ यूबी ८४९५) कच्च्या पुलावरून जाताना खड्डयात अडकला. दुसऱ्या दिवशी सकाळी अडकलेल्या गाड्या काढण्यासाठी जेसीबी आणण्यात आले. परंतु त्याचा फायदा झाला नाही.
गुरुवारी पहाटेपासून जोरदार पावसाने सीमा भागत हजेरी लावली. नदी पात्रात हळूहळू पाणी वाढत गेले व पर्यायी कच्च्या रस्त्यावरची खडी, मुरुम व दगडे वाहून गेली आणि वाहतूक ठप्प झाली. नदीला आलेले पाणी पहायला मोठ्या संख्येने लोक जमले व वरच्या बाजुने पाण्याचे लोट वहायला लागल्याने जमलेल्या लोकांनी अड़कुन पडलेल्या ट्रकच्या पाण्यात उलटतानाचा थरार अनुभवला. ट्रक उलटला व माल वाहून गेले असले तरी ट्रक जुन्या पुलास अडकल्याने तो वाहून गेला नाही. या घटनेचे धावते वर्णन करत तरुण ग्रामस्थांनी व्हिडिओ बनवून एकमेकांना शेअरही केला. दोन दिवस झाले तरी ट्रक वाहून जाण्याच्या घटनेतला थरार अजूनही कमी झालेला नाही....!