ट्रम्प यांना कोरोना झाल्यामुळे तेलंगाणातील चाहत्याचा ह्रदयविकाराने मृत्यू.

1 min read

ट्रम्प यांना कोरोना झाल्यामुळे तेलंगाणातील चाहत्याचा ह्रदयविकाराने मृत्यू.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तेलंगणातील बस्सा कृष्णा या चाहत्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने रविवारी निधन झाले.

मेदक (तेलंगणा) : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा तेलंगणातील बस्सा कृष्णा या चाहत्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने रविवारी निधन झाले. ट्रम्प यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती कळताच बस्सा कृष्णाला धक्का बसला होता. त्यानंतर त्यानं ट्रम्प यांच्यासाठी प्रार्थना सुरू केली होती. चार वर्षापूर्वी कृष्णा यानं जनगाव जिल्ह्यातील कोन्ने गावी डोनाल्ड ट्रम्प यांचा 6 फुट ऊंचीचा पुतळा स्थापन केला होता.

चार वर्षापूर्वी कृष्णा यानं जनगाव जिल्ह्यातील कोन्ने गावी डोनाल्ड ट्रम्प यांचा 6 फुट ऊंचीचा पुतळा स्थापन केला होता. कृष्णा ट्रम्प यांच्या पुतळ्याची पूजा करत होता.कृष्णानं मृत्यूच्या एक दिवस अगोदर ट्रम्प कोरोनातून लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करणारा भावनिक व्हिडीओ जारी केला होता. त्यामध्ये त्यानं ”ट्रम्प माझ्यासाठी देव आहेत, माझे त्यांच्यावर प्रेम आहे, ते लवकरच बरे होतील,असे व्हिडीओत म्हटले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या वाढदिवसाच्या दिवशी कृष्णा त्याच्या गावी विशेष पूजा आणि अन्नदानाचे आयोजन करत होता. या दिवशी तो फळ, मिठाई आणि चॉकलेटचे वाटप करायचा. बस्सा कृष्णा यांचे डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्याचे स्वप्न होते, मात्र ते अपुरं राहिले.

बस्सा कृष्णा मेदक जिल्ह्यातील तूपरण इथं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन झाले. ट्रम्प यांना कोरोना संसर्ग झाल्याचे कळताच बस्सा कृष्णा यांना मानसिक धक्का बसला होता. कृष्णा याच्या कुटुंबीयांनी ट्रम्प बरे होतील, त्यामुळं ताण घेण्याची गरज नाही, असे समजावले होते. पण, बस्सा कृष्णा यांच्या भूमिकेत बदल झाला नाही.