टाळेबंदीला नेमके कोणते निकष लावले जातात ?

1 min read

टाळेबंदीला नेमके कोणते निकष लावले जातात ?

पुन्हा लावल्या जाणारे लॉकडाऊनमुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला कोणतीही पुर्वकल्पना न देता मुख्यमंत्री निर्णय घेत असल्याने महाविकास आघाडीचे नेती नराज झाले आहे.

मुंबईः महाविकास आघाडीमध्ये लॉकडाऊनमुळे मतभेद निर्माण झाल्याचे स्पष्ट होते आहे. मुख्यमंत्र्याने मुंबईमध्ये दोन किलोमीटर परिघाबाहेर न फिरण्याचा निर्णय घेताना गृहमंत्र्यांनाही अंधारात ठेवण्यात आल्याबद्दल राष्ट्रवादी मध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. टाळेबंदी ह शब्दच हद्दपार करायची आहे. असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार सांगत असले तरी या मुद्दावरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माम झाल्याचे चित्र आहे. नेमकी कोणते निकष लावून टाळेबंदी केली जात आहे. असा प्रश्न सर्वसमान्यांला पडला आहे.

राज्यात स्थानिक पातळीवर एकापाठोपाठ एक निर्बंध लागू करण्याचे आदेश काढण्यात येत आहेत. सुमारे तीन हजार रुग्ण आसलेल्या औरंगाबादमध्ये टाळेबंदी नाही. पण सध्या केवळ नऊ रुग्ण असलेल्या बीडमध्ये गुरुवारपासून 9 जूलैपर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या चारही जिल्ह्यांत टाळेबंदी शिथिल केल्यानंतर रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाली. मात्र तिथे अद्याप तरी निर्बंधांचा निर्णय घेतलेला नाही. यामुळे टाळेबंदीसाठी कोणते निकष लावले जातात, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

images_1592484293398_balasaheb_thorat-1

टाळेबंदीची मुदत वाढविण्यावरुन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन मित्रपक्षांमध्ये सुरुवातीपासूनच मतमतांतरे होती. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरावड्यापासून राज्यातील व्यवहार टप्पाटप्प्याने सुरु करावेत, अशी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भुमीका होती. आणि काँग्रेसचा त्याला पाठिंबा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीपासूनच सावध भूमिका घेतली. जून महिन्यात राज्यातील व्यवहार सुरु करावेत, यासाठी पवारांनीच पुढाकार घेतला होता. त्यानंतरच राज्याने मिशन बिगीन अगेन ही मोहीम सुरु केली होती.

मुंबई ठाण्यातील रुग्णांची संख्या लक्षात घेता काही निर्बंध आवश्यक आहेत. पण त्यांची अंमलबजाणी करताना सामान्य जनतेला त्रास होऊ नये, ही काँग्रेसची भूमीका आहे. मुंबईत दोन किमी परिघाच्या वाहतूकीची कोणतीही पुर्वसूचना न देता निर्बंध घालण्यात आली. यातून अनेक जन नाहक भरडले गेले आहे. पोलिसांनी आधी कल्पना दिली असती तर जनतेला इतका त्रास झाला नसता लोकांच्या रोजीरोटीवर परिणाम होणार नाही याचीही सरकारने काळजी घ्यावी. असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
पुन्हा लॉकडाऊन आणि सरकारमधील मतभेद यावरुन राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार एक- दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.