तूर विकायचीय? जात सांगा

1 min read

तूर विकायचीय? जात सांगा

शेतक-यांनी शेतीमाल विकताना मालाची वर्गवारी करावी पण पिकविणा-याच्या जातीची वर्गवारी कशासाठी केली जात आहे? असा प्रश्न विचारत या जातीच्या उल्लेखावर आणि त्याची नोंद करण्यावर आक्षेप घेतला आहे.

हिंगोीत नाफेडचा प्रकार

एकाीकडे जाती अंताची लढाई चालू असताना नाफेड कडून तूर खरेदी करताना चक्क जात विचारली जात आहे.
नाफेड अंतर्गत हिंगोलीत तुर खरेदी चालू आहे. शेतक-यांची तूर खरेदी करत असताना शेतक-यांना एक फॉर्म भरून द्यावा लागतो. याच फॉर्मवर जात विचारणारा रकाणा ठेवण्यात आला आहे. या रकाण्यात इतर मागास वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण आणि इतर असे उल्लेख करण्यात आले आहेत.
शेतात पिकवलेली तूर विकण्यासाठी ही जातीची माहिती कशासाठी लागते हा मोठा प्रश्नच आहे. याबाबत अधिकारी कांहीच बोलायला तयार नाहीत. शेतक-यांनी शेतीमाल विकताना मालाची वर्गवारी करावी पण पिकविणा-याच्या जातीची वर्गवारी कशासाठी केली जात आहे? असा प्रश्न विचारत या जातीच्या उल्लेखावर आणि त्याची नोंद करण्यावर आक्षेप घेतला आहे.

---
अशा स्वरूपाची जातीची वर्गवारी करताना अमुक जातीच्या शेतक-याची जास्त तूर घ्यायची आणि विशिष्ट जातीच्या शेतक-यांची कमी तूर घ्यायची असा कांही नियम येणार आहे का? असा प्रश्न आता लोकांना पडू लागला. आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पतंगे यांनी तक्रार दाखल केली आहे. शेतीमालाचा दर नक्की ठरलेला असताना हा जातीचा उल्लेख कशासाठी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जात सांगूनच तूरीची खरेदी करण्याच्या या प्रकाराची सर्वत्र चर्चा होत आहे.