दिवसाढवळ्या चारचाकी फोडून अडीच लाखांची चोरी

अज्ञात चोराविरूध्द निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

दिवसाढवळ्या चारचाकी फोडून अडीच लाखांची चोरी

निलंगा : डी फार्मसी काॕलेज समोर उभा असलेल्या कारची काच फोडून आडीच लाख रूपयांची चोरी अज्ञात व्यक्ती विरूध निलंगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

शहरातील भारतीय स्टेट बँक आॕफ इंडिया येथून तीन लाख रूपये रक्कम उचलून प्रा.सिध्देश्वर संग्राम पाटील यांनी पन्नास हजार खिशात ठेवले व बाकी अडीच लाख रूपये रक्कम आपल्या गाडी क्रमांक एम.एच.१३ सी.एस.६१४९ मध्ये ठेवून डी.फार्मसी काॅलेज येथील मैदानातील मातोश्री सभागृहासमोर गाडी उभी करून डी.फार्मसी काॕलेज येथे शिकवणीसाठी गेले असता दिनांक ३० रोजी दुपारी १ वाजता अज्ञात चोराने त्यांच्या गाडीची काच फोडून गाडीमधील रोख रक्कम आडीच लाख रूपये घेऊन लंपास झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत निलंगा पोलिस ठाण्याचे पोलिस यांनी चोरी झालेल्या घटनास्थळाचा पंचनामा केला असून शहरातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी व फिंगर प्रिंट तपासणी केली आहे.निलंगा पोलिस सदरील अज्ञात चोराचा तपास घेत आहेत.संपूर्ण जिल्ह्यात सदरील चोरीच्या घटनेचा संदेश दिला असून याचा तपास लावण्यासाठी पथक नेमण्यात आले आहे.सध्या शहरात भीतीचे वातावरण पसरले असून शहरासह ग्रामीण भागात अशा चोऱ्या करणाऱ्या चोरांची टोळी असल्याचे बोलले जात आहे.दिवसाढवळ्या चोरी करून अज्ञात चोराने अडीच लाख रूपये पळवल्याने एकच खळबळ उडाली आहे.सदरील चोरीची घटना घडलेल्या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे व पोलिस निरिक्षक अनिल चोरमले यानी भेट देऊन तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे आदेश दिले व तात्काळ निलंगा पोलिस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एल.के.अक्कमवार हे करत आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.