वीज पडून दोन बैल व एक म्हैसी जागीच ठार

सरदारवाडी येथे आवकाळी पावसाचा फटका फळबागांचेही मोठे नुकसान 

वीज पडून दोन बैल व एक म्हैसी जागीच ठार

निलंगा: अचानक झालेल्या वादळी वा-यासह  आवकाळी पाऊसाने  निलंगा तालुक्यातील सरदारवाडी येथील शेतकरी सतीश तळभोगे यांच्या शेतातील झाडा खाली बांधलेले दोन बैल व ममदापूर येथील पांडुरंग एकनाथ बिरादार याची म्हैस विज पडुन जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

सरदारवाडी येथील नुकसानग्रस्त शेतकरी सतीश तळभोगे यांचे दोन हानम बैल व 1  याची अंदाजे किंमत एक लाख ७५ हजार असून तसेच ममदापूर येथील शेतकरी पांडूरंग बिराजदार यांची म्हैस अंदाजे किमत ६० हजार या शेतकऱ्यांना प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी होत आहे.

तलाठी सुनील मुगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केले असून त्वरित प्रशासनास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल पाठवून मदत मिळवून देऊ असे सांगितले आहे. पंचनामा करतेवेळी गावातील श्रीहरी डावरगावे, गुंडेराव मोरे, राजू होसुरे, रणजीत कोकणे, जनार्दन मोरे, सुरेश डावरगावे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

या अचानक झालेल्या वादळी वा-यासह पावसाने शेतकऱ्यांच्या पशुधनाचे व फळबागा आणि आंब्याचे प्रचंड नुकसान झाले आहे.सदरील परिसरात फळबागा जास्त असल्याने या अवकाळीचा त्यांनाही फटका बसला आहे.तरी शासनाने तात्काळ नोंदणीकृत फळबागा व भाजीपाला यांचेही पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी पंचायत समिती सभापती राधा बिराजदार यांनी केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.