ओल्या दुष्काळाचे दोन बळी

1 min read

ओल्या दुष्काळाचे दोन बळी

लातूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांची नापिकीला कंटाळून आत्महत्या.

निलंगा/प्रतिनिधी: यावर्षी पिके जोमदार आली मात्र हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आणि होत्याचे नव्हते झाले.अवेळीच पावसाने जोरदार हजेरी लावली आणि एका राञीत सारे उध्वस्त झाले आणि अवघ्या काही तासात होत्याचे नव्हते करून टाकले यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. जगावे का मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली याचा परिणाम असा झाला की लातूर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील अल्पभुधारक शेतकरी परमेश्वर नागनाथ बिरादार वय 34 यानी विहीरीत उड़ी मारून जीव दिला आहे.घरी कमी शेती असल्यामुळे लातुरला मोलमजूरी करत घरची शेती तो पहात होता.यावर्षी सोयाबीन चांगले आले होते, सोयाबीन काढले ही होते.त्याच दिवशी तुफान पाऊस झाला. काढलेले सोयाबीन पाण्यात वाहून गेले. यामुळे मानसिकरित्या खचलेला परमेश्वर दोन दिवसांपासून घरातून गायब होता. रात्री उशिरा त्याचा मृतदेह विहिरित सापडला.औराद शाहजनी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे.लॉकडाऊन मध्ये लातुरात काम नाही.शेतातील उत्तपन पाण्यात गेले यामुळे तो निराश होता अशी माहिती त्याच्या घराच्या लोकांनी दिली आहे

दुसरी घटना उदगीर तालुक्यातील आहे.

उदगीर तालुक्यातील वाढवना खुर्द येथील गोपीनाथ ग्यानोबा मद्देवाड वय ६८ वर्षे यांना तीन एकर शेती आहे. यावरच त्याच्या घरची रोजीरोटी चालते. मात्र यावर्षी सततच्या पावसाने त्यांचा घात केला.लोकांची देनी कशी द्यावी. कारण हातात आलेले उत्तपन पावसाने हेरावले.यामुळे शेतातील झाडाला गळफास घेत त्यानी जीवनयात्रा संपवली आहे.या बाबत वाढवणा पोलिसांत अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.