ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॉलीला धडकून एक ठार, एक जखमी..

ट्रॉलीला धडकून दुचाकीस्वार ठार

गंगाखेड : अपघातग्रस्त झालेल्या उसाच्या ट्रॉलीला धडकल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास परळी रस्त्यावरील वडगाव पाटीजवळ घडली.

अपघातात दुचाकीस्वाराचा भाऊ जखमी झाला आहे. विठ्ठल गणपत लांडगे असे मृताचे नाव आहे. सोनपेठ तालुक्यातील नैकोटा येथील विठ्ठल गणपत लांडगे (३२) व त्यांचा भाऊ अतुल गणपत लांडगे (२६) हे दोघे भाऊ एम.एच. २६ जे. ५६१९ क्रमांकाच्या दुचाकीवरुन रात्री गंगाखेडकडे येत होते. गंगाखेड-परळी रस्त्यावरील वडगाव पाटीजवळ एक ट्रॉली अपघातग्रस्त झाली होती. मध्यरात्री १२ वाजेच्या दरम्यान अंधारात त्यांना अपघातग्रस्त ट्रॉली दिसली नाही. ते त्यावर धडकले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अतुल गणपत लांडगे गंभीर जखमी आहे. अपघाताची माहिती समजताच पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक टी.टी. शिंदे, जमादार बाबुराव घरजाळे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतुल लांडगेस पोलिसांनी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मृत विठ्ठल लांडगेचा मृतदेह आज सकाळी नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.