टेंम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने चालक ठार...

टेंम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

परभणी : जिंतूर-औंढा रस्त्यावर भरधाव टेम्पोने एका दुचाकी चालकाला दिलेल्या धडकेत दुचाकीचा चालक जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी ११ च्या सुमारास घडली.

जिंतूर शहरापासून पाच-सहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या पुंगळा गावाजवळील मंदार पेट्रोलपंपासमोर गुरुवारी एका भरधाव टेम्पोने समोरून जाणाऱ्या क्र.एम.एच.२२.१९७९ क्रमांकाच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेने दुचाकीचालक विजय जगताप (वय २३, रा. भोगाव) हा तरूण जागेवरच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच जिंतूर महामार्ग केंद्राचे फौजदार राठोड, पोलीस कर्मचारी गजेंद्र फुगनर, जाधव, डोंबे, हरसुळकर आदींनी घटनास्थळी धाव घेतली.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.