जुने दिवस परत येण्यासाठी दोन वर्ष  लागतील– जागतिक आरोग्य संघटना

1 min read

जुने दिवस परत येण्यासाठी दोन वर्ष लागतील– जागतिक आरोग्य संघटना

कोविड काळ संपून पुन्हा ‘जुने दिवस’ परत येण्यासाठी किमान आणखी दोन वर्ष जातील. म्हणजे 2022 च्या आधी आयुष्य पूर्वपदावर येणे शक्य नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटने केला आहे.

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग हैराण आहे. कोरोनामुळे सर्वाच्या जीवनशैलीत बदल झाला आहे. कोरोना व्हायरसचा प्रकोप अद्यापही सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होताना दिसत आहे. कोविड काळ संपून पुन्हा ‘जुने दिवस’ परत येण्यासाठी किमान आणखी दोन वर्ष जातील. म्हणजे २०२० च्या आधी आयुष्य पूर्वपदावर येणे शक्य नाही, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी केला आहे.

डिसेंबर-जानेवारीत लस येईल. संसर्ग रोखायला लस आल्याने नक्कीच मदत होईल. मात्र एवढ्या मोठ्या लोकसंख्येला लस टोचण्यासाठी किमान दोन वर्ष लागतील. त्यामुळे तोवर आपल्याला आता जशी काळजी घेत आहोत, म्हणजे मास्क, वेळोवेळी हात धुणे, हॅण्ड सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे यापुढेही घेत राहावी लागणार आहे.

६० ते ७० टक्के लोकांना लसीमुळे रोगप्रतिकारशक्ती निर्माण होणे गरजेचे आहे. त्यामुळे लस बाजारात आली की, लगेच आपण निर्धास्त होण्यासारखी परिस्थिती नाही. सध्या कोरोना व्हायरस निर्मुलनाकडे नाही तर नियंत्रणात ठेवण्यावरच भर दिला जात आहे. कोरोनाचे संकट संपवण्याऐवजी सध्या कोरोना व्हायरसवर नियंत्रण कसं ठेवलं जाईल याकडे लक्ष दिलं जात आहे, असेही डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.