'एक बेडूक आणि त्याची दोन पोरे, उद्धव ठाकरेंची नाव न घेता राणेंवर टीका'

1 min read

'एक बेडूक आणि त्याची दोन पोरे, उद्धव ठाकरेंची नाव न घेता राणेंवर टीका'

‘काही जणांना इंजेक्शन द्यावे लागते. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते.

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे सातत्याने ठाकरे सरकारवर टीका करत असतात. यावरुन आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राणेंवर निशाणा साधला आहे. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरपुस शब्दात समाचार घेतला. ठाकरे यांनी नारायण राणे यांची तुलना बेडकाशी केली आहे.
पुढे ठाकरे म्हणाले की, ‘काही जणांना इंजेक्शन द्यावे लागते. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचे इंजेक्शन द्यावे लागते. काही जण तर अशी बेडूक आहेत. तुम्हा सर्वांना तर माहिती आहे एक बेडूक आणि त्याची दोन पोरे. या पक्षातून त्या पक्षात अशी टीका ठाकरे यांनी केली. त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून संयम बाळगणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अखेर संयम सोडल्याचे कालच्या दसऱ्या मेळाव्यातून दिसले.