मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर

चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळ

मुख्यमंत्री ठाकरे आणि नारायण राणे एकाच मंचावर

सिंधुदुर्गः सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. 20 वर्षांनंतर चिपी विमानतळाचे बांधकाम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे उपस्थित असणार आहेत. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर येणार आहेत.

चिपी विमानतळाचे उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय विमान वाहतूक उड्डान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.

केंद्रीय मंत्री आणि शिवसेना यांच्यातील वैर तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावर त्यांना थेट अटक करण्यात आली होती. त्यामुळे यांच्यातील वैर अधिकच वाढले आहे. आता आज 20 वर्षांनंतर चिपी विमानतळाचे बांधकाम पूर्ण होऊन त्याचं लोकार्पण केलं जाणार आहे. या निमित्ताने मुख्ममंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येणार असल्याने ते एकमेकांना भेटणार का, काय बोलणार यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर आज मिळणार आहेत.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.