उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार – संजय राऊत

1 min read

उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार – संजय राऊत

शिवसेना अयोध्येमध्ये थाटामाटात कार्यक्रम घेणार

Analyser Team/मुंबई : अयोध्येत झालेल्या राम मंदीर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आनंद व्यक्त केला आहे. मात्र, घुमट काढण्यात शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे याचं श्रेय कुणीही घेऊ नये. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्येला जाणार आहेत. शिवसेना तेथे थाटामाटात कार्यक्रम घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
"राम मंदिराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. ही आनंदाची गोष्ट आहे. हा शासकीय कार्यक्रम होता. आजचा मुहूर्त महत्वाचा होता. साधूसंतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन झालं आहे. आजच्या कार्यक्रमाचं श्रेय कोणीही घेऊ नये. कारण हा शासकीय कार्यक्रम होता. बाळासाहेबांना आणि शिवसेनेला कोणी विसरु शकत नाही. राम मंदिर उभारणीतील त्यांचे योगदान मोठे आहे. तसेच अनेकांचे यात योगदान आहे. घुमट काढण्यात शिवसैनिकांचं मोठं योगदान आहे" असंही राऊत म्हणाले.