केंद्रीय  आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या आईचे निधन, एम्सला डोळेदान

1 min read

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या आईचे निधन, एम्सला डोळेदान

माझी आई, या पृथ्वीवरील सर्वात प्रिय व्यक्ती होती. ती आज अविरत प्रवासावर गेली- डॉ. हर्षवर्धन

स्वप्नील कुमावत: केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्या आई स्नेहलता गोयल यांचे आज दिल्लीत निधन झाले. डॉ हर्षवर्धन यांनी ट्विट करुन ही माहिती दिली. आपल्या आईच्या मृत्यूवर अतिशय भावनिक ट्विट करताना ते म्हणाले, "माझी आई, या पृथ्वीवरील सर्वात प्रिय व्यक्ती होती. ती आज अविरत प्रवासावर गेली.डॉ. हर्षवर्धन यांच्या आई 89 वर्षांच्या होत्या. आज सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांच निधन झालं.

डॉ. हर्षवर्धन ट्विट करून आणखी एक माहिती दिली, आपल्या आईच्या इच्छेनुसार त्यांनी एम्सकडे डोळे दान केले आहेत, याशिवाय त्यांचे पार्थिव मौलाना आझाद मेडिकल कॉलेजला दिले आहे.
डॉ.हर्षवर्धन म्हणाले, माझी आई या पृथ्वीवरील सर्वात प्रिय व्यक्ती होती. ती आज अविरत प्रवासावर गेली.तिच्या आत्म्याला शांती मिळो.