विद्यापीठ कर्मचाऱ्याचा कुलसचिवांच्या दालनात रॉकेल ओतुन आत्मदहनाचा प्रयत्न

संयमाचा बांध फुटल्याने रोजंदारी कामगारांनी केला आत्मदहनाचा प्रयत्न...

विद्यापीठ कर्मचाऱ्याचा कुलसचिवांच्या दालनात रॉकेल ओतुन आत्मदहनाचा प्रयत्न

औरंगाबाद: रोजंदारी कामगारांच्या विविध मागण्यासंदर्भात निवेदन देऊन, आंदोलन करुनही विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले. संयमाचा बांध फुटल्याने रोजंदारी कामगारांनी कुलसचिव डॉ.जयश्री सुर्यवंशी यांच्या दालनात पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षक सुरेश परदेशी यांनी आंदोलनकर्त्यांना वेळीच रोखले. दरम्यान, आत्मदहन करणाऱ्यांविरूध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने विद्यापीठ फंडातून यापूर्वी ५४ जणांना कायम केले. त्या ५४ कामगारांप्रमाणे इतर रोजंदारी कामगारांना त्याप्रमाणे नियुक्त करून वेतनवाढ लागू करावी. विद्यापीठातील रोजंदारी कामगार, सफाई कामगार आणि सुरक्षारक्षक यांचे थकीत वेतन तत्काळ अदा करावे या मागण्यांसदर्भात भिमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. वेळप्रसंगी आंदोलनाचे हत्यारही उपसण्यात आले. परंतु, विद्यापीठ प्रशासनाने वेळोवेळी दुर्लक्ष केले.

शनिवारी अखेर संयमाचा बांध फुटलेल्या रोजंदारी कामगारांनी कुलसचिव डॉ.जयश्री सुर्यवंशी यांचे दालन गाठले. मागण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. मात्र, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संतप्त किरणराज पंडित यांनी अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार घडत असताना विद्यापीठाचे सुरक्षारक्षक सुरेश परदेशी यांनी आंदोलनकर्त्यास रोखले. संतप्त आंदोलनकर्त्यांना प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांच्या दालनात नेऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आंदोलनात किरणराज पंडित यांच्यासह भगवान निकाळजे, दिलीप जाधव, रतन चाबुकस्वार, धनराज भिंगारे, किशोर भिंगारे यांनी सहभाग नोंदविला होता.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.