विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी विद्यार्थिनींना करतात रात्री-अपरात्री 'संपर्क'

पिडीत विद्यार्थीनीची जनसंपर्क अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्याची मागणी, पोलीसात तक्रार....

विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी विद्यार्थिनींना करतात रात्री-अपरात्री 'संपर्क'

औरंगाबाद : विद्यापीठ म्हणजे शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. हजारो विद्यार्थी त्याठिकाणी शिक्षण घेण्यासाठी येतात. तर तेथील अधिकारी, कर्मचारी, प्रशासन, शिक्षक आपले विद्यापीठ शिक्षणात कसे अग्रेसर राहिल यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु काही अधिकारी, कर्मचारी आपल्या पदाचा गैरवापर करून गैरकृत्य केल्याच्या अनेक घटना आपण बघितल्या असतील. असाच एक प्रकार शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घडला आहे. विद्यापीठातील जनसंपर्क अधिकार्याने रात्री-अपरात्री एका विद्यार्थीनीला मेसेज करत आपल्याशी मैत्री करण्याची मागणी केली. या विद्यार्थीनीने समोर येत जनसंपर्क अधिकाऱ्याचे पितळ उघडे केले आहे.

आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी लागणारी माहिती घेण्यासाठी २७ ऑगस्ट रोजी एक विद्यार्थिनी जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांच्या दालनात गेली होती. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचे नियम पाळत विद्यार्थिनीने चेहऱ्यावर मास्क लावला होता. परंतु शिंदे यांनी तिचा चेहरा पाहता यावा यासाठी तिला मास्क काढण्यास सांगितले. त्यानंतर माहितीसाठी म्हणून मुलीने आपला नंबर अधिकाऱ्याला दिला. यानंतर ३ सप्टेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास जनसंपर्क अधिकारी शिंदे यांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थिनीला विचित्र मेसेज पाठवले. त्यामध्ये, 'डियर तू खूप सुंदर आहेस तू पहिल्या नजरेत आवडलीस, मला तुझ्याशी मैत्री करायची आहे' असा संवाद होता. विद्यार्थिनीने त्यांना मैत्री करण्यास नकार दिल्यानंतर 'बोल ना तुला राग आला का?' असे प्रतिप्रश्न केले. तसेच त्यानंतर काही वेळातच त्यांनी मेसेज डिलीट केले. यापूर्वी देखील त्यांनी अनेक मुलींसोबत असे प्रकार केले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विद्यापीठातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी असे वागणे अशोभनीय असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थिनीने केली आहे.
याप्रकरणी पिडीत विद्यार्थिनीच्या तक्रारीवरुन बेगमपुरा पोलीस ठाण्यात संजय शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.