‘अनलॉक 5’  थिएटर सुरू होणार?

1 min read

‘अनलॉक 5’ थिएटर सुरू होणार?

सिनेमा हॉल, जलतरण तलाव, पार्क अजूनही सरकारच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.

केंद्र सरकारने कोरोनामुळे बंद पडलेल्या कामकाजाकडे लक्ष देऊन जूनपासून 'अनलॉक' करण्याची प्रक्रिया सुरू केली. आतापर्यंत चार अनलॉक लागू केले गेले आहेत. त्याचबरोबर सरकार ऑक्टोबर महिन्यासाठी 'अनलॉक 5' बाबत नवीन मार्गदर्शक सूचना जारी करू शकते. तसेच पुढच्या महिन्यात सुरू होणा-या सणासुदीच्या उत्सवाची काळजी घेऊन नवीन सुचना जारी करू शकते.

मागील महिन्यात, गृह मंत्रालयाने असे म्हटले आहे की, कंटेनमेंट झोनच्या बाहेर अधिक व्यवहार सुरू करण्यास परवानगी दिली जाईल.

ऑक्टोबरमध्ये 'अनलॉक 5' मध्ये कोणती सूट अपेक्षित आहे?
मॉल, सलून, रेस्टॉरंट्स आणि जिमला काही प्रतिबंधांसह पुन्हा उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सिनेमा हॉल, जलतरण तलाव, पार्क अजूनही सरकारच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या विनंतीच्या निमित्ताने ऑक्टोबरपासून सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळणार आहे का? ते पाहावे लागेल.

पर्यटन क्षेत्राला सूट मिळू शकते?
या कोरोना मुळे सर्वाधिक परिणाम झाला, त्यामध्ये पर्यटन क्षेत्राचा समावेश आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत 'अनलॉक 5' मध्ये आणखी पर्यटन केंद्रे आणि पर्यटन स्थळे प्रवाशांसाठी उघडू शकतात.

अनेक राज्यांनी हॉटेल्स पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्याची आधीच योजना आखली आहे, जेणेकरून थंडीचा पर्यटन व्यवसाय पुन्हा सुरू करता येईल. सिक्कीम सरकारने 10 ऑक्टोबरपासून हॉटेल्स, गृह-निवास आणि पर्यटन संबंधित इतर सेवा पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.