उत्तर प्रदेशच्या कॅबिनेट मंत्री कमल वरुण याचं कोरोनाने निधन झालं आहे.18 जुलै रोजी त्यांची टेस्ट केली असता त्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्यांना लखनऊच्या पीजीआयमध्ये हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तेथेच त्यांचा रविवारी मृत्यू झाला.
कॅबिनेट मंत्री कमल वरुण
यूपी सरकारमधील तंत्रशिक्षण मंत्री पदाचा पदभार त्यांच्याकडे होता कमल राणी वरुण असं त्यांच पूर्ण नाव. त्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या सदस्या होत्या. यापूर्वी खासदारही राहिलेल्या आहेत. कमल वरुणचा यांचा जन्म 3 मे 1958 रोजी झाला. मृत्यूसमयी त्या 62 वर्षाच्या होत्या. गेल्याच महिन्यात त्यांची कोरोना टेस्ट केली गेली होती.
राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी लिहिले, उत्तर प्रदेश सरकारमधील माझ्या सहकारी कॅबिनेट मंत्री श्रीमती कमल राणी वरुणजी यांच्या अकाली निधनाची बातमी त्रासदायक आहे. राज्याने आज एक निष्ठावंत सार्वजनिक महिला नेतृत्व गमावलं. मी त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो. देव दिवंगत आत्म्याला चरणी स्थान देईल.
ॐ शांती!
