युरीयाचा काळा बाजार अन शेतकरी बेजार

1 min read

युरीयाचा काळा बाजार अन शेतकरी बेजार

शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना धडा शिकवणार शेतकरी संघटना

सिद्धेश्वर गिरी /प्रतिनिधी: ऐन शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांना वेठीस धरुन खतांचा काळाबाजार तालुक्यात सुरु असुन यामुळे शेतकरी बेजार झाले आहेत. काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून दुष्काळ व नापिकी झेलणाऱ्या शेतकऱ्यांवर या वर्षी कोरोनाचे संकट आले आहे .या वर्षी तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे सोयाबीन न उगवल्याचे प्रकरण ताजे असतांनाच शेती साठी आवश्यक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन त्यांचा काळा बाजार केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दि १३ रोजी सोशल मिडीयावर एक कृषी सेवा केंद्र चालक आपल्या गोदामातुन शेतकऱ्यांकडुन जास्तीचे पैसै घेऊन युरीया खत देत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. चार दिवसापूर्वी आलेला संपुर्ण युरीया शेतकऱ्यांना वाटल्याचा दावा कृषी सेवा केंद्र चालकांनी केला होता .संपुर्ण युरीया चार दिवसापुर्वी वाटलेला असतांना दुकानदारांच्या गोदामात हा युरीया आला कुठुन असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
कृषी अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने कृषी विभाग व जिल्हा परिषद कृषी विभाग क्वारंटाईन झाल्याने कृषी केंद्र चालक मनमानी करत आहेत. या पुर्वी ही बियाण्यांचा मोठा काळाबाजार करण्यात आला होता.
जास्तीचे पैसै दिल्यास हवा तो खत व बियाणे उपलब्ध सामान्य शेतकऱ्यांना मात्र झिडकारले जात असल्याची तक्रार सामान्य शेतकरी करत आहेत.
शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांना धडा शिकवणार
शेतकरी संघटना
सोनपेठ तालुक्यात शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. काही दिवसापुर्वी आलेला युरीया जर पुर्णपणे वाटला तर गोदामात कुठुन खत आला . याची तपासणी होणे गरजेचे आहे .कोणताही दुकानदार जास्तीचे पैसै घेऊन शेतकऱ्यांना लुटत असेल तर शेतकरी संघटना त्याला धडा शिकवणार असल्याचे शेतकरी संघटनेचे सुधीर बिंदू यांनी सांगितले .