चेंडूवर हँड सॅनिटायझरचा वापर, गोलंदाज निलंबित.

1 min read

चेंडूवर हँड सॅनिटायझरचा वापर, गोलंदाज निलंबित.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि विविध देशांच्या मंडळाने चेंडू चमकण्यासाठी बॉलवर लाळ वापरण्यास मनाई केली आहे. परंतु इतर कोणत्याही कृत्रिम पदार्थाच्या वापरास मान्यता दिली नाही.

इंग्लंडचा प्रथम श्रेणीचा क्रिकेटपटू मिच क्लेडॉनला त्यांच्या काऊन्टी संघाने बॉलवर सॅनिटायझर लावल्याच्या आरोपाखाली निलंबित केले आहे. मागील महिन्यात एका सामन्या दरम्यान 37 वर्षीय उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मिच क्लेडॉनवर चेंडूवर सॅनिटायझर लावल्याचा आरोप होता. त्याने या सामन्यात तीन बळी घेतले होते.
WhatsApp-Image-2020-09-06-at-1.44.27-PM
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) या प्रकरणाचा तपास सुरू केला असता त्यात तो दोषी आढळल्यामुळे त्याला ऩिलंबित करण्यात आले. कोरोना विषाणू साथीच्या कठोर आरोग्य नियमांनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि विविध देशांच्या मंडळाने चेंडू चमकण्यासाठी बॉलवर लाळ वापरण्यास मनाई केली आहे. परंतु इतर कोणत्याही कृत्रिम पदार्थाच्या वापरास मान्यता दिली नाही. या निलंबनामुळे मिच क्लेडॉन पुढच्या बॉब विलिस ट्रॉफी सामन्यात खेळू शकणार नाही.