वापरलेले मास्क धुवून विकणारी टोळी पकडली.

1 min read

वापरलेले मास्क धुवून विकणारी टोळी पकडली.

संकाटाचा गैर फायदा घेत वापरलेले मास्क धूवून परत विक्री करणारे रॅकेट मुंबईतील भिवंडीत सापडले. इम्रान खान यास अटक करण्यात आली असून त्याला कोठडीत पाठविण्यात आले आहे.

मुंबई - प्रतिनिधी
संकट आले की त्यात संधी शोधून लाभ उचलणारी स्वार्थी मंडळी कमी नाहीत. लोकांच्या आयुष्याशी खेळत पैसे कमाविण्याचा वाईट धंदा अनेकजण करत असतात. असाच एक व्यक्ती पोलीसांच्या सतर्कतेमुळे मुंबईत उघडा पडला. वापरलेले मास्क परत स्वच्छ करून विक्रीस नेण्याचा उद्योग उघडा झाला.
जगभरात करोनाचा धुमाकुळ चाललेला असताना मास्क आणि सॅनिटायजरची मागणी वाढत चालली आहे. याचाच फायदा घेत वापरलेले मास्क स्वच्छ करून परत एकदा विक्रीस आणण्याचा उद्योग देखील तेजीत आला आहे. भिवंडी तालुक्यातील पुर्णा ग्रामपंचायत हद्दीत पाईपलाईन लगत एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात मास्क फेकून देत होता. याचा संशय आल्याने चौकशी केल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. या व्यक्तीकडे एवढे मास्क आले कुठून हॉंस्पीटलचे असतील तर वैद्यकीय कच-यात ती मास्क कशी गेली नाहीत असे अनेक प्रश्न होते.
इम्रान शेख असे ते कामगाराचे नाव आहे. त्याला नारपोली पोलीसांनी अटक केल्यानंतर भलतेच सत्य बाहेर आले. भिवंडीतील अनेक गोदामात असे वापरलेले मास्क आढळून आले. ते धूवून परत वापरासाठी पाठवले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर अशा गोदाम मालकांची देखील चौकशी आता सुरू झाली आहे.
 
भिवंडी पोलिसांनी  आरोग्य विभागाचे डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तपासणी केली असता भिवंडी तालुक्यातील वळगाव येथील पारसनाथ कंपाऊंड गोदामातील माल पुर्णा ग्रामपंचायत  हद्दीतील मुंबई मनपा पाणी पुरवठा पाईपलाईन शेजारील कचऱ्यात मोठ्या प्रमाणात पुरावा नष्ट करण्याचा हेतूने फेकून दिल्याचे उघडकीस आलं होतं.
पोलिसांनी या प्रकरणी नोंद घेत तपास सुरू केला असता गोदाम मालकाचा सांगण्यावरून इम्रान शेख या कामगाराने ते फेकून दिल्याचे चौकशीत उघड झाले आहे. इम्रान याला नारपोली पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजार केले. कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे, अशी माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे.