आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाचा धडाका

आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरणाचा धडाका

सोनपेठ : शहरासह तालुक्यात कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.मागील अनेक दिवसांपासून कोरोनावर मात करण्यासाठी राज्य शासनाने कवचकुंडल अभियान राबवले आहे.यासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुभाष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोनपेठमध्ये लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

ग्रामीण भागात काही गावात १००%लसीकरण पूर्ण करण्यात आले असून यासाठी सरपंच,ग्रामसेवक आणि ग्रामस्थ यांनी लसीकरण करून घेण्यासाठी आपले योगदान दिले आहे. डॉक्टर पवार यांनी यापूर्वी आरोग्यविषयक कामे करताना,आरोग्य शिबिरे राबवताना ग्रामीण भागात रुग्णांकडे जातीने लक्ष देत आरोग्य विभागावर पकड निर्माण केली आहे. तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींपैकी १४ ग्रामपंचायती १००% लसीकरण करून कोरोना मुक्तीकडे वाटचाल केली असून ३१ ऑक्टोंबरपर्यंत तालुक्यातील ग्रामीण भागासह शहराला १००% लसीकरण करुन कोरोमुक्तीकडे वाटचाल करणार असल्याचा संकल्प डॉ.पवार यांनी केला आहे.तसेच त्यांनी रात्रीच्या वेळी लसीकरणाचे केंद्र सुरु करत लस घेण्यासाठी नकारात्मक विचार करणाऱ्या ग्रामस्थांसह नागरिकांना लसीकरण करुन घेण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.जिल्ह्यात क्रमांक दोनला तालुक्याची वाटचाल झाली असून यात परभणी शहरांपेक्षा सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ६५ हजार लसीकरण करण्यात आल्याची माहिती डॉ.पवार यांनी दिली.

यावेळी त्यांनी या लसीकरण मोहिमेसाठी प्रशासनातील सोनपेठ शहरातील उच्च अधिकाऱ्यांचे व खातेप्रमुखांचे सहकार्य लाभले असून या लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.विष्णू राठोड,पंडीत चव्हाण,बी.एन.गायकवाड,सुपरवायझर रेखा मुंडे,डॉ स्वप्नील जोशी यांनी योगदान दिले असल्याचे सांगितले.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.