साठ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू

देशभरात आज 1 मार्च पासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच एम्स रूग्णालयात जाऊन कोविडचा लस घेतली. ६० वर्षावरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील अनुषंगीक आजार असलेल्या व्यक्तींना देण्यास सुरवात झाली आहे.

साठ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरू

विजय कुलकर्णी/परभणी: देशभरात आज 1 मार्च पासून कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच एम्स रूग्णालयात जाऊन कोविडचा लस घेतली. ६० वर्षावरील तसेच ४५ ते ५९ वयोगटातील अनुषंगीक आजार असलेल्या व्यक्तींना देण्यास सुरवात झाली आहे. परभणी मध्येही कोरोना लसीकरणाची सुरूवात झाल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी एनालायझरशी बोलताना दिली.

सोमवारी जिल्हा शासकीय रुग्णालयासह सर्व ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात तसेच जायकवाडीजवळील व इनायतनगरातील महापालिकेच्या दवाखान्यात लसीकरण देण्यात येत आहे. जे खासगी रुग्णालय महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना इत्यादी अंतर्गत नोंदणीकृत आहेत. तेथे देखील कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यात परभणी शहरातील स्पर्श रुग्णालय, स्वाती क्रिटीकल केअर सेंटर, डॉ. प्रफुल्ल पाटील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व मानवत येथील मानवत मल्टीस्पेशालिटी येथे २५० रुपयांत लस देण्यात येणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, खासगी रुग्णालयातील कोवीन २.० अंतर्गत नोंदणीचे कामकाज प्रगतिपथावर असून लवकरच त्या ठिकाणी लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. मंगळवार दि.२ रोजी पासुन जास्तीत जास्त प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरण करण्यात येणार आहे. लाभार्थींनी ओळखपत्र सोबत ठेवून लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांच्यासह जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नागरगोजे यांनी केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.