वंचित बहुजन आघाडी राज्यभर डफली बजाव आंदोलन करनार.

1 min read

वंचित बहुजन आघाडी राज्यभर डफली बजाव आंदोलन करनार.

सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम

सिद्धेश्वर गिरी /प्रतिनिधी: केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून,  सरकार काहीही सवलत द्यायला तयार नाही, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर 12 ऑगस्ट  रोजी डफली वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे . राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनीक बससेवा सुरू झाल्याच पाहिजेत.  या प्रमुख मागणीला घेऊन हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत . या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला घेऊन राज्यातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपो समोर दिवसभर डफडे वाजविण्याचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी हाती  घेणार आहे. अशी घोषणा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी तालुका सोनपेठ च्या वतीने 12 ऑगस्ट रोजी सोशल डिस्टन्स ठेऊन आंदोलन केले जाणार असल्याचे निवेदन तालुका अध्यक्ष रामेश्वर पंडीत, शहरअध्यक्ष शेख रईस,  मुंडे गुरुजी मार्गदर्शक, आदींनी पोलीस ठाणे सोनपेठ व नायब तहसीलदार,तहसील कार्यालय सोनपेठ येथे निवेदन  दिले आहे.