महाएनजीओ फेडरेशन व आत्मनिर्भर भारत अंतर्गत सेवा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम.

1 min read

महाएनजीओ फेडरेशन व आत्मनिर्भर भारत अंतर्गत सेवा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवासप्ताह कार्यक्रमाचे आयोजन

सिध्देश्वर गिरी/सोनपेठ: सोनपेठ तालुक्यातील शिर्शी येथील नवजिवन बहुउद्येशिय सेवाभावी संस्था रूपला नाईक तांडा शिर्शि(बु.) यांच्या वतीने महाएनजीओ फेडरेशन व आत्मनिर्भर भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवासप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
WhatsApp-Image-2020-09-27-at-3.06.12-PM--1-
यात नवजीवन बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाची रेलचल आठवडाभर होणार आहे. यामध्ये स्वच्छता कार्यक्रम, सॅनिटरी पॅड वाटप, वृक्षारोपण, निसर्ग वंदन, आदी कार्यक्रम होणार आहेत. यासोबतच कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्यात येणार आहे. या सेवासप्ताह निमित्ताने आज वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अंकुश पवार व भारतीय जनता पार्टीच्या ओ.बी.सी.महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा विमल पवार यांच्यासह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.