राज्यात लवकरच शिक्षक भरती, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

राज्यातील शिक्षण विभागात एकूण 2062 जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया

राज्यात लवकरच शिक्षक भरती, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात लवकरच २०६२ जागांसाठी शिक्षक भरतीची प्रक्रिया होणार आहे. यात शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या उमेदवारांपैकी ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस केलीय. याबाबतची माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्वत: ट्विट करुन हि माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की,पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ५६१ खाजगी व्यवस्थापनाच्या २०६२ रिक्त पदांसाठी १५१२३ पसंतीक्रमावर ३९०२ उमेदवारांची मुलाखतीसाठी शिफारस करण्यात येत आहे. उमेदवारांना मुलाखतीसाठी हार्दिक शुभेच्छा! अशी माहिती गायकवाड यांनी दिली आहे.

राज्यात ४० हजार पदे रिक्त
राज्यात सद्यस्थितीत एकूण ४० हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे २७ हजार आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे १३ हजार अशी एकूण ४० हजार पदे रिक्त आहेत. टप्प्याटप्प्यानं शिक्षण विभागात ही जागा भरणार आहे. पहिल्या टप्प्यात ६१०० जागा भरण्यात येईल.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.