वर्षा गायकवाड यांची संवदेनशीलता  अपघात ग्रस्ताला मदत

1 min read

वर्षा गायकवाड यांची संवदेनशीलता अपघात ग्रस्ताला मदत

अपघातग्रस्त इसमाला तात्काळ केली मदत

हिंगोली- हिंगोलीच्या पालकमंत्री तथा राज्याच्या शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड ह्या हिंगोलीकडे येत असताना माकडाच्या धडकेने रस्त्याच्या कडेला पडून गंभीर झालेल्या इसमास त्यांनी संवेदनशीलता दाखवत स्वतः उतरून विचारपूस करीत कळमनुरी येथील रुग्णालयात हलविले.
जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय उपाययोजनांचा आढावा घेण्याकरिता आज दुपारी नांदेड येथील विमानतळावरून वर्षाताई गायकवाड ह्या खा. राजीव सातव यांच्यासह हिंगोलीकडे येत होत्या. कळमनुरीच्या पुढे मसोड फाट्याजवळ दुपारी चारच्या सुमारास भरधाव वेगातील दुचाकी क्रमांक एम एच 38 एन 6334 च्या चालकास माकडाने धडक दिली. सदर धडकेमुळे दुचाकीचालक रस्त्याच्या खाली कोसळला. याचदरम्यान मंत्री महोदय यांचा ताफा घटनास्थळ जवळ पोहोचला परिस्थिती लक्षात येताच वर्षाताई गायकवाड व खा राजीवभाऊ सातव यांनी ताफा थांबवून सदर इसमास तात्काळ ताफ्यातील वाहनाद्वारे कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता हलविले. मंत्रीमहोदयांच्या संवेदनशीलतेचा यानिमित्ताने प्रत्यय आला.