लातूर: वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावला...!केवळ खराब रस्त्यामुळे वेळेवर रुग्णालयात पोचू न शकल्याने एका ५३ वर्षीय इसमाचे निधन झाले. हजारो कोटीची विकास कामे झालेल्या लातूर शहरपासून हाकेच्या अंतरावरील वरवंटीच्या महादेवनगर वस्तीत ही दुर्घटना घडली.
मेहजुद्दीन क़ाझी यांना शुक्रवारी हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने त्यांना गावातील ऑटोद्वारे नातेवाईक उपचारासाठी लातूरला घेऊन जात होते. पण वस्तीचा रस्ता अतिशय खराब असल्यामुळे ऑटो चिखलात फसला. गांवकऱ्यांनी महत्प्रयासाने ऑटो काढून लातूरला पाठवला खरा. पण रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच मेहजुद्दीन काझी यांनी ऑटोमध्येच अखेरचा श्वास घेतला होता.
हजारो कोटी रूपयांच्या विकास कामाचा गवगवा केला जात असला तरी विकासाची गंगा वाडी-वस्तीवर अजूनही पोहचली नसल्याचे या घटनेने स्पष्ट झाले....!
वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावला...!
केवळ खराब रस्त्यामुळे वेळेवर रुग्णालयात पोचू न शकल्याने एका ५३ वर्षीय इसमाचे निधन झाले.

Loading...