जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या नुकसानग्रस्त भागांना भेटी

अधिकाऱ्यांनाही दिल्या सूचना

जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या नुकसानग्रस्त भागांना भेटी

परभणी : जिल्हाधिकरी आंचल सुद गोयल यांनी गूरूवारी सेलू तालुक्यातील अतिवृष्टी व दुधना, कसुरा, या नदयांच्या महापुरामुळे झालेल्या शेतजमीनीच्या नुकसानीची पहाणी करीत उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना नुकसानग्रस्त शेतक-यांना तातडीने दिलासा द्यावा अशा सूचना दिल्या.

दरम्यान सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगांव नजीकच्या कसुरा नदीपात्रा जवळील महापुराने झालेल्या शेतजमीनीच्या नुकसानीची पाहणी केली.नुकसानग्रस्त शेतक-यांनी कसुरा नदीचे पात्र अरुंद असून वाढलेल्या पाण्यामुळे नदीपात्राजवळील जवळपास १०० ते १५० हेक्टर जमीन प्रत्येक वर्षी नुकसानग्रस्त होते. त्यामुळे कसुरा नदीच्या पात्रांत रुंदीकरण करून द्यावे अशी विनंती केली.

तसेच निम्न दुधना प्रकल्पाच्या कॅनालमुळे शेतजमीनीतील पाणी शेतातच थांबते. कधीकधी कनॉलचा रस्ता फुटुन शेतीला जाण्यायेण्याचा रस्ता बंद होतो, त्यामुळे दुधना प्रकल्पाच्या यंत्रणेकडून कॕनॉल दुरुस्ती, कॅनालच्या बाजुला चर करणे या उपाययोजना कराव्यात अशा सुचना जिल्हाधिकारी यांच्या समोर मांडल्या. मोरेगांव येथील राज्य रस्त्यावरील दुधना नदीवरील नवीन पुलाचे काम व नदीला आलेल्या महापुरामुळे पात्रा नजीकच्या शेतजमीनचे नुकसानाची माहीती घेतली असता तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी गोमेवाकडी, ब्रम्हवाकडी, शिराळा, खादगांव, ब्राम्हणगांव, वाघ पिंपरी, मोरेगांव, खेर्डा, डिग्रस बरसाले, काजळी रोहीणा, राजेवाडी, राजा, डुघरा, वलंगवाडी, आंबेमांव दिग्रर व सोन्ना या गावातील नुकसानीची सविस्तरपणे माहीती जिल्हाधिकारी यांना दिली. उपस्थित शेतक-यांना शेतजमीनीच्या नुकसानी बाबत विमा कंपनीला ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज करूनही आपला दावा दाखल करता येईल. तसेच नुकसानग्रस्त शेतक-यांची शेतजमीनीवर जाऊन नोटकॅमचे फोटो घेवून पीक पहाणी करावी व पंचनामा करावा. अशा आपत्तीच्या काळात लोकांना व शेतक-यांना तातडीने दिलासा दयावा अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी अधिका-यांना दिल्या.

पाहणी दौ-यात जिल्हाधिकारी यांच्या सोबत उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण ज-हाड, तहसीलदार बालाजी शेवाळे, तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, मंडळ अधिकारी सोनवणे, माने, तलाठी युनुस, आष्टीकर हे हजर होते.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.