१ डिसेंबरला पदवीधरसाठी मतदान.

1 min read

१ डिसेंबरला पदवीधरसाठी मतदान.

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम

औरंगाबाद: 1 डिसेंबर रोजी पदवीधरची निवडणूक होणार आहे. बहुप्रतिक्षेत असलेली पदवीधरची निवडणुक आता लवकरच होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आयोजीत पत्रकार परिषदेमध्ये दिली.
निवडणुकीचा कार्यक्रम विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी घोषीत केला. ५ नोव्हेंबर २०२०ला निवडणुकीची अधिसुचना जारी होईल. तर १२ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतीम दिनांक असेल. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आठवड्याची मुदत मिळणार आहे. १३ नोव्हेबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होईल. तर १७ नोव्हेबर पर्यंत उमेदवारी अर्ज वापस घेता येतील. २३ दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत. १ डिसेंबर रोजी मतदान होईल तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
**• 5 नोव्हेंबरला अधिसुचना निघेल.
• 12 नोव्हेंबरला अर्ज भरण्याची अंतिम तारीख
• 13 नोव्हेंबर अर्जाची छाननी होईल.
• 17 नोव्हेंबर अर्ज वापस घेण्याची तारीख.
• 1 डिसेंबर रोजी मतदान होईल. मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यत.
• 3 डिसेंबर रोजी मोजणी होईल.
**