एखाद्या व्यक्तिने आपली शंभरावी ओलांडली आहे आणि ती आपला 25 वा वाढदिवस साजरा करत आहे. हे ऐकायला देखील जरा विचिञच वाटते. परंतु हे सत्य आहे. खरे सांगायचे तर यामागे एक रहस्य दडलेले आहे. इंग्लंड मध्ये राहणारया डोरीस क्लेफी नाव असलेल्या महिलेची ही कहाणी आहे.
डोरिस क्लेफी आज शंभर वर्षांच्या आहेत, परंतु त्या आपला 25 वा वाढदिवस कुटुंबासमवेत साजरा करीत आहे. त्याच्या कुटुंबियांनीही त्यांना एक सरप्राईज पार्टी दिली आहे. चला तर जाणून घेऊया की, नेमके असे झाले कसे.
आपल्याला तर माहितच आहे की, दर चार वर्षांनी लीप वर्ष येते. या लीप वर्षातच फेब्रुवारी महिन्यात डोरिस क्लेफी यांचा जन्म झाला होता. त्यानुसार, वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांचा हा 25 वा वाढदिवस होता. एका मुलाखतीत डोरीस म्हणाल्या की, 'मी खूप आनंदी आहे. मी माझे संपूर्ण जीवन प्रसिद्ध होण्यासाठी प्रतीक्षा केली आणि आता माझे स्वप्न साकार झाले. मला आता उर्वरित आयुष्य माझ्या कुटुंबासह आणि नवीन मित्रांसह घालवायचे आहे. '
आहारात चांगल्या दर्जाचे अन्न आणि नियमित वापरलेले डायट प्लॅन हे त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे. आपला आवडता बिस्कीट खाऊन त्या यावर्षीचा वाढदिवस साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 1979 मध्ये त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या आपली मुलगी आणि सून यांच्याबरोबर राहायला गेल्या परंतु नंतर त्यांची मुलगीही मरण पावली.