व्यापारी महासंघाची जंम्बो कार्यकारिणी जाहीर

1 min read

व्यापारी महासंघाची जंम्बो कार्यकारिणी जाहीर

तरुणांना शहर कार्यकारिणीत संधी

हिंगोली- जिल्हा व्यापारी महासंघाच्या आज पार पडलेल्या बैठकीमध्ये महासंघाची जंम्बो कार्यकारिणी अध्यक्ष गजानन घुगे यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आली. हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या अध्यक्षपदी गजानन घुगे यांची निवड झाल्यानंतर आज त्यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीमध्ये महासंघाची संपूर्ण कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये बारा जणांची संरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी रमेश चंन्द्र बगडिया तर उपाध्यक्षपदी डॉक्टर लक्ष्मीकांत गुंडेवार, श्यामसुंदर मुंदडा, सुभाष लदनिया यांच्यासह तब्बल 22 जणांची निवड करण्यात आली आहे.
WhatsApp-Image-2020-10-04-at-6.12.41-PM
कार्यकारिणीच्या सचिवपदी प्रकाश सोनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सात जणांची सहसचिव चार जणांची कोषाध्यक्ष, सात जणांची सहकोषाध्यक्ष, दोन जणांची कायदेविषयक सल्लागार तर वीस जणांची जिल्हा व्यापारी महासंघाच्या कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त तरुण व्यापाऱ्यांना संधी मिळावी याकरिता शहराध्यक्षपदी पंकज अग्रवाल यांची निवड करण्यात आली आहे. अशी शहराची जंम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान मंगळवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी हिंगोली येथे व्यापारी महासंघाच्या वतीने मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येणार आहे. पुढील काळात सर्व व्यापारांचा विमा देखील काढण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात व्यापारी बांधव उपस्थित होते.