अमेरीकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या दौ-यानंतर आता भारताला काय मिळाले किंवा नरेंद्र मोदी यांची किती प्रतिष्ठा आहे याची चर्चा मोठ्या प्रमाणावर मोदी समर्थक करत आहेत. तर ट्रंप आणि मोदी सबंधाची खिल्ली त्यांचे विरोधक उडवत आहेत. दोन्ही बाजुनी जोरादार आक्रमणे होत आहेत.
ट्रंप भेटीचा फायदा कोणाला याचा विचार करण्या आधी ट्रंप यांनी काय साधले हे तपासणे आवश्यक आहे. मोदी जितके बनिया असतील त्यापेक्षा मोठा बनिया ट्रंप निघाले आहेत. ते व्यापारी नेता असल्याचे त्यांच्या भारत भेटीवरून सिध्द झाले आहे.
ट्रंप सोबत दोस्ती दाखवत मोदी यांनी आपली प्रतिमा जगभरात मोठी करून घेतली तर ट्रंप यांनी आपली अमेरीकेतील व्होट बँक मजबुत करून घेतली आहे.
एक गोष्ट महत्वाची की, अमेरीकेत येणारे वर्ष निवडणुकांचे वर्ष असणार आहे. माय डिअर फ्रेंड असा पंतप्रधान मोदींचा सतत उल्लेख करत असताना ते पाकिस्तानला देखील आपला चांगला मित्र म्हणायला विसरले नाहीत. अगदी मोटेरा स्टेडीयम वरच्या भाषणात आणि संयुक्त पत्रकार परिषदेत ते पाकिस्तानाला मित्र म्हणून गेले.
ट्रंप यांची मोठी अडचण ही आहे की, अफगानिस्तानात अमेरीके्चे हजारो सैनिक अडकून पडलेले आहेत. अफगानिस्तानातील तालीबानी कारवाया थांबत नाहीत तोवर या अमेरीकन सैनिकांची सुटका होणार नाही. याचसाठी त्यांना पाकिस्तानची मदत लागणार आहे. तसे झाले तर त्यांना निवडणुक सोपी जाणार आहे. सैनिक देशात परत आणल्याचा डांगोरा पिटता येणार आहे. आणि तालिबानी लोकांशी चर्चा करायला पाकिस्तानच उपयोगी ठरणार आहे.
दुसरा मुद्दा म्हणजे त्यांनी आपल्या भाषणात स्वामी विवेकानंद, सरदार पटेल, मोदी, सचिन तेंडूलकर, विराट कोहली ही नावे घेतली ट्रंप पक्के राजकीय बनिया आहेत हे येथेच सिध्द होते. अमेरीकेत असलेल्या समुदायाला आपलेसे करण्याची संधी ट्रंप यांनी सोडली नाही. याच लोकांना माणनारा मोठा वर्ग अमेरीकेत आहे.
चिनचे वाढते महत्व कमी करण्यासाठी भारताचा आधार घ्यायला देखील ट्रंप विसरले नाहीत.
भारताला अपाचे हेलीकॉप्टर देण्याची प्रक्रिया आधीपासूनच चालू आहे. रोमियो हे हेलीकॉप्टर भारतीय नोदलाला हवे होते, ते मिळाले इतकेच. पण ही वस्तुंची खरेदी आहे. तंत्रज्ञानाचे हस्तांतरण नाही. राफेल प्रमाणे करार झाला असता तर नक्कीच भारताच्या हाती चांगली गोष्ट लागली असती. पण या रोमिओ आणि अपाचे मध्ये लाभ अमेरीकेचा अधिक आहे. नाही म्हणायला भारताला चांगली अस्त्र मिळाली हा आपला फायदा.
ट्र्ंप यांनी काय टाळले?
भारत पाकिस्तान संबंधात भाष्य करण्याचे टाळत दोन्ही देश आपसात चर्चा करून वाद संपवतील असे ते बोलले. यात मध्यस्थीची शक्यता संपली आहे. आणि भारत आणि मोदी यांची नाराजी ओढवून घेणे त्यांनी टाळले.
सीएए च्या मुद्यावर त्यांनी हा भारताचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत भाष्य करणे टाळले. दौरा काळात झालेल्या हिसाचाराच उल्लेख अथवा त्यावर भाष्य मोठ्या खुबीने ट्रंप यांनी टाळत मैत्री आणि राजधर्म दोन्ही निभावला.