पारंपारिक वाद्य आणि नृत्य करीत वाघ्या मुरळींचे आंदोलन

1 min read

पारंपारिक वाद्य आणि नृत्य करीत वाघ्या मुरळींचे आंदोलन

पारंपारिक वाद्य आणि नृत्य करीत केलेल्या आंदोलनाने जिल्हाधिकारी परिसर दुमदुमून गेला होता.

सुमित दंडुके/औरंगाबाद: वाघ्या-मुरळीची शासन दरबारी नोंद व्हावी, कलावंतांच्या मुलांना मोफत शिक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी वाघ्या मुरळी परिषदेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. पारंपारिक वाद्य आणि नृत्य करीत केलेल्या आंदोलनाने जिल्हाधिकारी परिसर दुमदुमून गेला होता. कोरोना संकटाने समाजाची अवस्था बिकट झाली आहे मुलांचे शिक्षण करणे अवघड बनले आहे. ही परिस्थिती बघून शासनाने तातडीने वाघ्या मुरळी कलावंतांना मदत करावी, बेघरांना घर द्यावे, कलावंतांना मानधन द्यावे. यासह मुलांना मोफत शिक्षणाची सोय करावी आदी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.