लाचखोरीची प्रकरणं आली तर डायरेक्ट उचलबांगडी,आयुक्तांचा इशारा.

1 min read

लाचखोरीची प्रकरणं आली तर डायरेक्ट उचलबांगडी,आयुक्तांचा इशारा.

आता लाचखोरीचे प्रकरण आल्यास थेट ठाणे प्रमुखांचीच बदली होणार,शहर पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांचा कडक इशारा .

सुमित दंडुके / औरंगाबाद : पोलिसांच्या लाचखोरीच्या घटना वाढत असल्याने पोलीस आयुक्तांनी आता थेट पोलीस ठाणे प्रमुखांना इशारा दिला आहे. या पुढे लाचखोरीची प्रकरणं आली तर त्यांची उचलबांगडी केली जाईल, असं शहर पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता म्हणाले.
WhatsApp-Image-2020-11-05-at-2.24.16-PM
गेल्या दोन महिन्याच्या काळात शहरात चार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाई झालेल्या आहेत. या कारवाईत लाच घेणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी लाच प्रकरणात चौथी कारवाई होती. ही कारवाई झाल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी यापुढे कारवाईसाठी संबंधित पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त यांना जबाबदार धरण्यात येईल, अशा स्पष्ट सुचना दिल्या आहेत. संबंधित अधिकारी पोलिस ठाण्यात दफ्तर तपासणी नीट करीत नाहीत. डॉ. गुप्ता यांनी शहरातील सहाय्यक पोलिस आयुक्त यांना देखील नियमितपणे पोलिस ठाण्याला भेट देण्याची सुचना केली. भेटी दरम्यान सहाय्यक पोलिस आयुक्त यांनी चिकीत्सक पदधतीने पाहणी करावी, संशयीत पोलिस कर्मचाऱ्यांबाबत योग्य ती कारवाई करावी, संशयास्पद पोलिस कर्मचाऱ्यांकडे गुन्ह्यांचा तपास देण्यात येऊ नये, तसेच पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या तक्रारी किंवा फिर्यादींचा आढावा घेऊन आवश्यक कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना केल्या.

शहर पोलीस आयुक्त निखील गुप्ता 

बुधवारी झालेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर एकही लाचेचे प्रकरण शहर पोलिस विभागात आढळल्यास संबंधीत पोलिस निरीक्षकाला जबाबदार धरून त्याची बदली करण्याचे आदेश तत्काळ देण्यात येतील. याशिवाय अशा प्रकरणात संबंधीत ठाणे प्रमुखांना कारणे दाखवा नोटीसही बजाविण्याचा आदेश डॉ. गुप्ता यांनी दिला.