बाहेर कोरोना घरात पाणी

लातूर- जहीराबाद महामार्ग लगतच्या घरात पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. आनंदवाडीच्या चवरे कुटुंबीयांनी घरातच रात्र काढली जागून

बाहेर कोरोना घरात पाणी

निलंगा: निलंगा तालुक्यातील गौरपाटी येथून लातूर ते जहीराबाद हा नव्याने महामार्ग करण्यात आला असून या महामार्गाचे घरापेक्षा उंची वाढल्याने आनंदवाडी येथील दिनकर चवरे यांच्या राहत्या घरामध्ये शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाचे पाणी घरामध्ये शिरल्याने घरातील ज्वारी गहू डाळ आधी संसार उपयोगी साहित्य पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले व हे पाणी घरात शिरल्याने चौरे कुटुंबातील पत्नी दोन लहान मुलांना रात्र जागून काढावी लागली आहे संबंधित विभागाने याचा पंचनामा करून त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी दिनकर चवरे यांनी मागणी केली आहे.

बाहेर कोरोना...घरात पाणी..

कोरोना या महामारीची दुसरी लाट सध्या सुरू असून घरातच बसा असे शासनाचे निर्देश आहेत सध्या दिनकर चौरे यांच्या घरापासून लातूर ते जहीराबाद या महामार्गाचे काम करण्यात आले असून रस्त्याची उंची वाढली परंतु साईडने नादच करण्यात आली नसल्याने या रस्त्याकडे वरील पावसाचे पाणी चक्क दिनकर चौरे यांच्या घरामध्ये शिरले परिणामी याच पाण्यामध्ये पत्नी दोन लहान मुलांना घेऊन घरातच बसून रात्र कुडकुडत घरातच काढली त्यांचे आर्थिक नुकसानही झाले या घराशेजारी नाल्या टाकून द्याव्यात अशी गुत्तेदारकडे वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष होत आहे गुत्तेदार यांच्या हलगर्जीपणामुळे चौरे कुटुंबियांस नाहक त्रास सहन करावा लागत आहेनिलंगा तालुक्यात अवकाळी पावसाचा फटका.

शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वारे पाऊस आल्याने तालुक्यातील ज्वारी आंबा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले जोरदार पावसाने अनेक झाडे उन्मळून पडले आहेतरस्त्या कडेपासून घरापर्यंत नाली टाकून द्यावी अशी गुत्तेदार आकडे वेळोवेळी मागणीही केली आहे परंतु गुप्ते दाराच्या दुर्लक्षामुळे नाली टाकण्यात आली नसल्याने आमच्या जीवितास धोका निर्माण झाला तर गुत्तेदार जबाबदार असेल असे उद्विग्न होऊन दिनकर चवरे म्हणाले


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.