भाजपला उत्तर देणारच- अनिल परब

अनिल परब यांचा भाजपला इशारा...

भाजपला उत्तर देणारच- अनिल परब

मुंबई : भाजप-सेनेमधला वाद संपताना दिसत नाहीये. भाजप कार्यकर्ते आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यामधल्या संघर्षानंतर अजूनही या प्रकरणावर दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांना उत्तर प्रत्युत्तर देत आहेत. आज शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. आम्ही भाजपला उत्तर देऊ असे ते म्हटले आहे.

पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. 'शिवसेना भवनासमोर झालेल्या राड्याचे उत्तर शिवसेना देईल' असे ते म्हणाले. हा परब यांनी भाजपला इशाराच दिल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सेना-भाजप मधला संघर्ष आणखी काही काळ चालेल असे दिसत आहे.

शिवसेना भवनाजवळ दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आल्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचे नेते आक्रमक झाले आहेत. या घटनेनंतर भाजपने शिवसेनेला गुंडांचा पक्ष असे संबोधले होते. मात्र शिवसेना गुंडगिरी करते. कोणी मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेना भवनावर चाल करून येत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. मुंबई महाराष्ट्राला मिळण्यासाठीही गुंडगिरी करावी लागली होती. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही, कारण आम्ही सर्टिफाइड गुंड आहोत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.