आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही- फडणवीस

तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही.

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही- फडणवीस

नागपुर : वेळ आल्यास शिवसेना भवन फोडू,असं वक्तव्य करणाऱ्या प्रसाद लाड यांच्यावर शिवसैनिक चांगलेच संतापले आहेत.त्यानंतर लाड यांनी मी केलेल्या भाषणाचा विपर्यास केला गेल्याचं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय. याच प्रकरणावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तोडफोड करणं भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. आमच्य़ासाठी हा विषय संपलेला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

याबाबत माध्यमांनी नागरपूरमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, ‘तोडफोड करणं आमची संस्कृती नाही.आम्ही तोडफोड करत नाही. काल प्रसाद लाड यांचे जे वक्तव्य समोर आले किंवा जे त्यांनी म्हटल्याचे सांगितले गेले, त्याबद्दल त्यांनी व्हिडीओद्वारे खुलासाही केला आहे. आमच्यासाठी विषय संपला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

प्रसाद लाड हे दादर येथील कार्यक्रमात म्हणाले होते की,‘शिवसेनेला वाटत की आम्ही माहीममध्ये आल्यावर सेनाभवन फुटेल. त्यांना सांगतो की वेळ आली तर आम्ही ते सुद्धा करू.’यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. तर शिवसैनिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यामुळे आता प्रसाद लाड यांनी आपल्या बोलण्याचे खापर माध्यमांवर फोडले आहे. मी तसे म्हणालोच नाही असे म्हणत लाड यांनी घुमजाव केले आहे.


Share Tweet Send
0 Comments
Loading...
You've successfully subscribed to Analyser News
Great! Next, complete checkout for full access to Analyser News
Welcome back! You've successfully signed in
Success! Your account is fully activated, you now have access to all content.