सुर्य-चंद्र राहीलच आम्हाला इतरांकडून ज्ञान घेण्याची गरज नाही-संजय राऊत

1 min read

सुर्य-चंद्र राहीलच आम्हाला इतरांकडून ज्ञान घेण्याची गरज नाही-संजय राऊत

बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. ‘जोपर्यंत सुर्य - चंद्र असतील तोपर्यंत बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही’, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केलं होतं.

मुंबई : बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग आहे. ‘जोपर्यंत सुर्य - चंद्र  असतील तोपर्यंत बेळगाव महाराष्ट्राला मिळणार नाही’, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी  यांनी केलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. सुर्य-चंद्र राहीलच आम्हाला इतरांकडून ज्ञान घेण्याची गरज नाही, त्यांनी त्यांचे पाहावे. बेळगावातील सीमाप्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा या मागणीसाठी बेळगाव व सीमाभागात १ नोव्हेंबर रोजी काळा दिवस पाळला जातो. सीमाभागातील नागरिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ यंदा १ नोव्हेंबर रोजी काळ्या फिती बांधत कामकाज पाहणार आहे.

बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांची लढाई 60 वर्षांपासून सुरू आहे. ही आमच्या हक्काची लढाई आहे. सीमाभागातील जनतेच्या हक्कांची आणि अधिकाराची लढाई आहे. बेळगाव आणि सीमाभागातील जनतेला महाराष्ट्रात यायचेअसेल तर त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे. महाराष्ट्रात येऊ दिले पाहिजे.

कन्नड भाषिक लोक केरळ, आंध्रप्रदेशात असतील तर त्यांना कर्नाटकमध्ये जायचं असेल तर त्यांच्या भावनेचा आदर केला पाहिजे. देश एक आहे आणि राहील, सीमाभागातील जनतेची लढाई देशविरोधी नाही. भाषावार प्रांतरचना बनवली आहे. तर मराठी भाषिकांना त्यांच्या राज्यात जायचं असेल तर तेथील जनतेच्या भावनेचा विचार न्यायालय, सरकारने केला पाहिजे. असे संजय राऊत म्हणाले.